मिळकत कराची थकबाकी असलेल्या २१ मालमत्ता शासनाधीन !
पिंपरी – मिळकत कराची थकबाकी असलेल्या २१ मालमत्ता महापालिकेच्या कर आकारणी आणि संकलन विभागाने शासनाधीन केल्या आहेत. यापैकी १२ मालमत्ताधारकांनी ९२ लाख ९३ सहस्र ४७३ रुपये थकीत कर जमा केला आहे. शहरातील ३१ सहस्र ९७१ व्यावसायिक मिळकतधारांकडे ६३१ कोटी रुपयांचा कर थकीत आहे. चिखली आणि भोसरी येथील औद्योगिक आणि बिगर निवासी थकबाकी असलेल्या २१ मालमत्ता शासनाधीन केल्या आहेत. १ लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या सदनिका धारकांवरही कारवाई करण्याचे नियोजन केले आहे, असे साहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.