मुंबई आणि जामनगर (गुजरात) येथून कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त
मुंबई – दक्षिण मुंबईतील एस्.बी. रोड फोर्ट परिसरातील एका गोदामातून १२० कोटी रुपयांचा ६० किलो मेफेड्रोन (एम्.डी.) हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. अमली पदार्थ नियंत्रण विभाग (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो -‘एन्.सी.बी.’) यांनी ही कारवाई करून ‘एअर इंडिया’च्या माजी वैमानिकासह २ जणांना अटक केली आहे. नौदल इंटेलिजन्स युनिट आणि एन्.सी.बी. यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत गुजरातमधील जामनगर येथून १० किलो एम्.डी. हा अमली पदार्थ कह्यात घेण्यात आला. येथे ३ जणांना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही प्रकरणांचा एकमेकांशी संबंध असल्याचे लक्षात आले आहे.
ऑगस्टमध्ये मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पालघर जिल्ह्यातून १ सहस्र ४०० कोटी रुपयांचे ७७० किलो एम्.डी. पकडले होते.