अमेरिकेत ५ मासांत १४ हिंदु महिलांची लूटमार करणार्या व्यक्तीला अटक !
२८ लाख रुपयांहून अधिक किमतीची आभूषणे लूटली !
सॅन फ्रॅन्सिस्को (अमेरिका) – जून २०२२ पासून सॅन हॉजे, मल्पिटस, सनीवेल आणि सांटा क्लारा या कॅलिर्फाेनिया राज्यातील शहरांमध्ये किमान १४ हिंदु महिलांची लूटमार करणार्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याला नुकतेच न्यायालयात उपस्थित करण्यात आले. त्याच्या विरोधातील आरोप सिद्ध झाल्यास त्याला ६३ वर्षांची शिक्षा होऊ शकते. पुढील सुनावणी ४ नोव्हेंबर या दिवशी होणार आहे.
सांटा क्लारा काउंटीच्या जिल्हा न्यायाधिकरण कार्यालयानुसार लूटमार करणार्याचे नाव लॅथन जॉन्सन असून तो मंगळसूत्र घातलेल्या, टिकली लावलेल्या आणि साडी नेसलेल्या हिंदु महिलांना लक्ष्य करत असे. पॉलो आल्टोचा रहिवासी असलेला ३७ वर्षीय जॉन्सन हा हिंदु महिलांच्या गळ्यातील चेन आणि मंगळसूत्र लुटून त्यांना मारहाण करून चारचाकी वाहनाने घटनास्थळावरून फरार होत असे. तो प्रामुख्याने ५० ते ७३ वर्षे वयाच्या हिंदु महिलांची लूटमार करत असे. त्याने आतापर्यंत चोरलेल्या आभूषणांचे एकूण मूल्य ३५ सहस्र अमेरिकी डॉलर्स (२८ लाख ७७ सहस्र भारतीय रुपये) आहे.
संपादकीय भूमिका
|