विदेशी गांडुळापासून बनवलेले गांडूळ खत वापरू नका !
सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम
‘सेंद्रिय शेती’त ‘इसेनिया फेटिडा (Eisenia Foetida)’ हे विदेशी गांडूळ वापरले जातात. हे भारताच्या सर्व प्रदेशांतील तापमानांत जिवंत राहू शकत नाहीत. हे गांडूळ केवळ अर्धवट कुजलेले काष्ठ पदार्थ (पालापाचोळा, शेण इत्यादी) खातात. माती खात नाहीत. विदेशी गांडुळांच्या विष्ठेत पारा, शिसे यांसारखे विषारी धातूंचे अंश असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. हे विषारी अंश गांडूळ खतावर पिकवलेल्या पिकांच्या माध्यमातून मानवी शरिरात प्रवेश करू शकतात. यामुळे विदेशी गांडुळांपासून बनवलेले गांडूळ खत वापरणे धोकादायक आहे.
याउलट भारतीय गांडूळ मात्र भारताच्या सर्व प्रदेशांतील तापमानांत तग धरू शकतात. भारतीय गांडूळ मातीही खातात. ते भूमीत सतत वर-खाली हालचाल करून भूमी सच्छिद्र करतात. यामुळे भूमीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढते. नैसर्गिक शेतीमध्ये भारतीय गांडुळांचाच वापर केला जातो.’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (१८.९.२०२२)