डॉ. निखिल सैंदाणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार !
नाशिक येथील बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणी नवीन समिती गठीत !
नाशिक – जिल्हा रुग्णालयातील बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणी केंद्रीय आरोग्य सचिवांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र अपहार प्रकरणातील तत्कालीन अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने ६ ऑक्टोबर या दिवशी राखून ठेवला. त्यामुळे डॉ. सैंदाणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. शिवाय बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र आणि कोरोना काळातील ७५ कोटी रुपयांच्या उपकरणे खरेदीतही केंद्रीय आरोग्य सचिवांनी ठपका ठेवत चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नवीन समितीच्या माध्यमातून या प्रकरणाचा छडा लावला जाणार आहे.
नाशिक जिल्हा रुग्णालयातून आंतरजिल्हा स्थानांतरांसाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र रॅकेट काही दिवसांपूर्वी उघडकीस आले होते. यामध्ये ग्रामीण पोलीस दलातील पोलीस दलाची फसवणूक केल्याचा गुन्हा २१ पोलीस कर्मचार्यांवर नोंद झालेला आहे, तसेच जिल्हा रुग्णालयाचा कर्मचारी कांतीलाल गांगुर्डे, पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिक हिरा कनोज हे दोघे मध्यवर्ती कारागृहातील न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणात काही खासगी रुग्णालयांचा समावेश असल्याचे समोर आले होते. त्यानुसार संशयित डॉ. स्वप्नील सैंदाणेसह विवेक ठाकरे यास अटक करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकावैद्यांनी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रे देणे गंभीर असून अशांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! |