सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
साधका, गुरुचरणी ठेव भाव ।
भाव (टीप १) तेथे देव ।
साधका, (टीप २) गुरुचरणी ठेव भाव ।। १ ।।
प्रार्थनेत भाव, कृतज्ञतेत भाव ।
सत्सेवेत भाव, प्रीतीत भाव ।। २ ।।
आनंदासाठी भाव, शांतीसाठी भाव ।
गुरुकृपेसाठी भाव, गुरुप्राप्तीसाठी भाव ।। ३ ।।
त्रासावरी (टीप ३) मात करी भाव ।
भीषण आपत्काळात तारील भाव ।। ४ ।।
परम पूज्यांच्या (टीप ४) कृपेने कळला भाव ।
परम पूज्यांच्या सगुण-निर्गुण रूपावर ठेवा भाव ।
परम पूज्यांच्या चरणी प्रार्थना करतो, निर्माण होण्या भाव ।। ५ ।।
टीप १ – ‘मी’च्या जागी ईश्वर किंवा गुरु यांच्या अस्तित्वाविषयीची उत्कटतेने आणि अंतःकरणापासून जाणीव अन् ओढ निर्माण होणे
टीप २ – मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करणारा
टीप ३ – शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास
टीप ४ – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२४.१०.२०२०)