देवतांचे विडंबन करणार्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाला मनसेचा पाठिंबा !
मुंबई – ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटात देवतांना विचित्र रूपात दाखवण्यात आल्याने, तसेच रावणाला मुसलमानाप्रमाणे दाखवण्यात आल्याने हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि भाजप यांनी त्याला विरोध केला आहे; परंतु मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी या चित्रपटाला पाठिंबा असल्याचे घोषित केले आहे.
MNS leader Ameya Khopkar comes out in support of ‘Adipurush’ director Om Raut
Read @ANI Story | https://t.co/HWoYKLoHwQ#Adipurush #OmRaut #AmeyaKhopkar #Bollywood pic.twitter.com/pKj5iS0oos
— ANI Digital (@ani_digital) October 7, 2022
खोपकर यांनी ट्वीट करून म्हटले आहे, ‘‘ओमने याआधी ‘लोकमान्य’ आणि ‘तान्हाजी’ सारखे चित्रपट केले आहेत. ओम राऊत हा हिंदुत्ववादी माणूस आहे. सिनेमा समजणार्या हिंदुत्ववादी नेत्यांना माझा प्रश्न आहे की, फक्त ९५ सेकंदांच्या ‘टीझर’वरून (चित्रपटाची ओळख करून देणारा विज्ञापनासारखा काही सेकंदाचा भाग) चित्रपट कसा असेल, याचा अंदाज तुम्ही कसा बांधता ? आधी चित्रपट पहा आणि मग ठरवा.’’ (‘टीझर’मध्ये अनेक आक्षेपार्ह गोष्टी दिसत असतांना प्रत्यक्ष चित्रपटात किती असतील, याची कल्पनाच करू शकत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या देवतांच्या संदर्भात त्यांचे रूप कशाही पद्धतीने दाखवले जाते, हा हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याचाच परिणाम आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|