बिदर (कर्नाटक) येथे ५६२ वर्ष जुन्या मदरशामध्ये जमावाकडून पूजा
|
बिदर (कर्नाटक) – येथे ५६२ वर्ष जुन्या महमूद गवान मदरशामध्ये जमावाने पूजा केल्याची घटना ६ ऑक्टोबरच्या रात्री घडली. या घटनेनंतर येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुसलमान संघटनांनी या घटनेचा निषेध केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. वर्ष १४६० मध्ये हा मदरसा बांधण्यात आला होता. सध्या तो भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या नियंत्रणात आहे. येथील एका ठिकाणी वर्षातून २ वेळा पूजा करण्याची अनुमती असतांना त्या जागेऐवजी मदरशात पूजा करण्यात आल्याने त्याचा विरोध केला जात आहे. पूजेच्या घटनेनंतर पोलिसांनी ९ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करून आतापर्यंत ४ जणांना अटक केली आहे. तसेच ५ जणांचा शोध घेण्यात येत आहे.
भीड़ ने 562 साल पुराने मदरसे में जबरन घुसकर की पूजा, बीदर के ऐतिहासिक मदरसे में पूजा पर बवाल…ओवैसी ने बीजेपी पर बोला हमला #Karnataka #Madrasa @Payodhi_Shashi pic.twitter.com/Ru9MRrrXan
— Zee News (@ZeeNews) October 7, 2022
१. पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार निजामच्या काळापासून दसर्याला पूजा करण्याची परंपरा आहे. मदरशाच्या आवारात एक मिनार आहे. वर्षातून दोन वेळा २ ते ४ लोक आतमध्ये पूजा करण्यासाठी जातात; पण या वेळी मोठ्या संख्येने लोक आतमध्ये गेले होते. कुणीही अवैधरित्या प्रवेशद्वार तोडून आतमध्ये घुसखोरी केलेली नाही. आम्ही गुन्हा नोंदवलेला आहे.
२. पोलीस महानिरीक्षकांनी सांगितले की, हिंदू मदरशाच्या जवळ असणार्या झाडाजवळ जाऊन नेहमी पूजा करतात; पण या वेळी तिथे ते झाड नव्हते. हिंदू तेथे गेले असतील, तर यामध्ये काही नवीन नाही. प्रत्येक विजयादशमीला ते पूजा करण्यासाठी जातात.
असदुद्दीन ओवैसी यांची टीका
एम्.आय.एम्.चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी या घटनेवरून राज्यातील सत्ताधारी भाजप सरकारवर टीका केली आहे. त्यांनी या घटनेसाठी जमावाला प्रोत्साहन दिल्याचा ओवैसी यांनी आरोप केला आहे.
संपादकीय भूमिका
|