हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर येथे श्री दुर्गामाता दौडीचे स्वागत !
सोलापूर, ६ ऑक्टोबर (वार्ता.) – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने घटस्थापनेपासून प्रतिदिन शहरातील ७ भागांतून दुर्गामाता दाैड काढण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री दुर्गामाता दौडीच्या वेळी सौ. श्रीदेवी पाटील आणि सौ. सुनीता न्यामणे यांनी धर्मध्वजाचे औक्षण केले. या प्रसंगी समितीचे श्री. विक्रम घोडके यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.