पनवेलला जाणार्या लोकलमध्ये महिलांच्या दोन गटांत हाणामारी
पनवेल – येथे ६ ऑक्टोबरच्या रात्री पावणे ८ वाजता पनवेलला जाणार्या लोकल गाडीमध्ये प्रवासी महिलांच्या दोन गटांत हाणामारी झाली. यात महिला पोलीस कर्मचारी घायाळ झाल्या. लोकलमधील बसण्याच्या जागेवरून एकमेकींमध्ये वाद झाला होता. शाब्दिक वादाचे रूपांतर मारामारीत झाले. लोकलमध्ये नेरूळ स्थानकातून महिला पोलीस कर्मचारी भांडण सोडवण्यासाठी चढल्या; परंतु संतप्त प्रवासी महिलांनी त्यांनाही जुमानले नाही. त्यांनी महिला पोलिसालाही मारहाण केली. (महिला पोलिसावरही हात उगारला जाणे म्हणजे कायदा-सुव्यवस्थेचे भयच राहिले नसल्याचे लक्षण ! – संपादक)