विजयादशमीनिमित्त धारावी (मुंबई) येथे शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन !
मुंबई, ६ ऑक्टोबर (वार्ता.) – विजयादशमीनिमित्त धारावी येथील ‘ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पाेरेशन लिमिटेड’ आस्थापनामध्ये स्थानीय लोकाधिकार समिती या कर्मचारी संघटनेच्या वतीने ४ ऑक्टोबर या दिवशी शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. तलवार, भाले, कट्यार, दांडपट्टा, चिलखत, ढाल आदी शस्त्रांचा या प्रदर्शनात समावेश होता. या वेळी दुर्गादेवीचे आणि शस्त्रास्त्रांचे पूजन करण्यात आले.