…तर भारताची अर्थव्यवस्था आतंकवादाच्या हातात जाईल ! – दुर्गेश परूळकर
९ ऑक्टोबरला होणार्या हलाल सक्तीविरोधी परिषदेला उपस्थित रहाण्याचे हिंदूंना आवाहन !
ठाणे, ६ ऑक्टोबर (वार्ता.) – हलाल जिहादच्या माध्यमातून भारतावर आर्थिक संकटाचा घाट घातला जात आहे. याला वैध मार्गाने विरोध करायला हवा. अन्यथा देशाची अर्थव्यवस्था आतंकवाद्यांच्या हातात जाईल, अशी भीती डोंबिवली येथील हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक श्री. दुर्गेश परूळकर यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केली. ९ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे हलाल सक्तीविरोधी परिषदेला समस्त हिंदूंनी उपस्थित रहाण्याचे आवाहनही त्यांनी आवाहन केले.
🟢 ‘हलाल सक्ती विरोधी परिषद’ एवं ‘हलाल जिहाद’ ग्रंथ लोकार्पण समारोह 🟢
🔸 रविवार, 9 अक्टूबर 2022। सायं. 5.30
📍स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क, दादर (प.)Live :
▫️ https://t.co/C3I2jeMCXz
▫️ https://t.co/5FC5vSuoChआयोजक : @SavarkarSmarak @HinduJagrutiOrg pic.twitter.com/TG1oBhWrlb
— HJS Mumbai (@HJSMumbai) October 6, 2022
या वेळी श्री. परूळकर म्हणाले, ‘‘हलालच्या षड्यंत्राला हिंदूंनी विरोध करायला हवा. याविषयी जागृती करण्यासाठीच हलाल सक्तीविरोधी परिषद आयोजित करण्यात आली आहे. हलाल जिहादच्या माध्यमातून भारताच्या अर्थव्यवस्थेवर आक्रमण होत आहे. हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून मिळणार्या पैशाचा वापर विघातक कृत्यांसाठी केला जात आहे. हा प्रश्न केवळ आपल्या देशापुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण जगात याचे पडसाद उमटत आहेत. या विरोधात संघटित होऊन आंदोलन करणे आवश्यक आहे.’’