मेक्सिकोमध्ये झालेल्या गोळीबारात राजधानीच्या महापौरांसह १८ जणांचा मृत्यू
मेक्सिको सिटी (मेक्सिको) – दक्षिण अमेरिका खंडातील मेक्सिको देशात असलेल्या सॅन मिग्यूएल टोटोलपॅन येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेत एकूण १८ जणांचा मृत्यू झाला, तर ३ जण घायाळ झाले. या घटनेत राजधानी मेक्सिको सिटीचे महापौर कॉनरॅडो मेंडोझा यांच्यासह त्यांच्या वडिलांचाही मृत्यू झाला आहे.
Mayor among dead as gunmen launch attack in Mexico town https://t.co/4Q6u7FLUhk
— BBC News (World) (@BBCWorld) October 6, 2022
‘लॉस टेक्विलेरोस’ या गुन्हेगारी टोळीने या गोळीबाराचे दायित्व घेतले आहे. या टोळीच्या सदस्यांनी तसा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित केला आहे; मात्र येथील स्थानिक पोलीस अधिकार्यांचे म्हणणे आहे की, हा गोळीबार कुणी केला, हे अद्याप सांगता येणार नाही.