पुणे येथील चांदणी चौकातील पूल बांधण्याचा व्यय २५ लाख; पाडण्याचा व्यय दीड कोटी !
पुणे – येथील चांदणी चौकातील पूल पाडण्याची घटना केवळ पुण्यातच नव्हे, तर देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. ६०० किलो स्फोटके वापरूनही पूल पूर्णपणे पडला नाही, तो खिळखिळा झाला, काही ‘गर्डर’ आणि स्टीलचे अवशेष शिल्लक राहिले. हा पूल उभारण्यासाठी ३ दशकांपूर्वी २५ लाख रुपये व्यय आला होता; मात्र हा पूल पाडण्यासाठी जवळपास दीड कोटी रुपये व्यय आला आहे, अशी माहिती हा पूल उभारणार्या बार्ली आस्थापनाचे सतीश मराठे यांनी दिली. एखादे काम सचोटीने केले, तर ते चांगलेच होते. हा पूल पाडल्यानंतर वाईट वाटले; परंतु सध्या या पुलामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने तो पाडण्याच्या व्यतिरिक्त दुसरा उपाय नव्हता. विकासाच्या दृष्टीने ते आवश्यकच असते, अशी भावना मराठे यांनी व्यक्त केली.