लागवड करतांना पहिल्या प्रयत्नात यश आले नाही, तरी निराश होऊ नये !
सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम
‘भाजीपाला लागवड करतांना काही वेळा पहिल्याच प्रयत्नात यश आले नाही,’ असे होऊ शकते. अशा वेळी निराश न होता ‘आपले काही चुकले आहे का ?’, हे शोधावे. पुनः पुन्हा कृती केल्यावर ‘झाडांची वाढ कशी होते ?’, याचे शास्त्र हळूहळू आपल्याला कळू लागते. काही वेळा कृतीला आरंभ करतांना अचानक आलेला पाऊस, तसेच वातावरणातील पालट हेसुद्धा बिया रुजून न येण्याचे किंवा फळधारणा न होण्याचे कारण असू शकते. ‘आच्छादन योग्य प्रकारे केले आहे का ?, जिवामृताचा नियमित उपयोग चालू आहे ना ? पाण्याचे प्रमाण योग्य आहे ना ?’, हे पडताळून पहावे आणि प्रयत्नांमध्ये खंड पडू देऊ नये.’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (१९.९.२०२२)