गृहिणींनो, दुपारच्या जेवणामध्ये विविधता आणा !
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ६८
‘माणूस हा चवीचा भोक्ता आहे. विविध प्रकारचे चवदार पदार्थ खाण्याची आवड प्रत्येकालाच असते. बर्याच वेळा असे होते की, आठवड्याभरात घरी अल्पाहारासाठी प्रतिदिन वेगळा पदार्थ बनतो; परंतु दुपारच्या जेवणात ‘तोच तोच’पणा असतो. असे झाल्याने घरच्या व्यक्तींना भूक नसतांना केवळ चवीसाठी अल्पाहार खाण्याची इच्छा होते. त्यामुळे सकाळचा किंवा सायंकाळचा अल्पाहार सोडवत नाही. घरच्यांना २ वेळाच आहार घेण्याची आरोग्यदायी सवय लावायची असेल, तर दुपारच्या जेवणात विविधता आणावी. गृहिणींनी नेहमी नवीन शिकण्याची सवय ठेवल्यास हे सहज शक्य आहे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.९.२०२२)