वर्ष २०२१ च्या नवरात्रीच्या कालावधीतील भक्तीसत्संगात श्री सरस्वतीदेवीचे वर्णन ऐकतांना साधकाने अनुभवलेली भावस्थिती !
१. ‘वर्ष २०२१ च्या नवरात्रीच्या कालावधीतील महानवमीच्या दिवशी भक्तीसत्संगात वीणावादन लावले असतांना ‘आदिशक्ती श्री सरस्वतीदेवीच्या रूपात येऊन वीणावादन करत आहे’, असे मला जाणवले.
२. ‘लहानपणापासून श्री सरस्वतीदेवी सतत समवेत आहे’, असे वाटणे
भक्तीसत्संगात श्री सरस्वतीदेवीचे वर्णन ऐकतांना माझ्या मनात मधून मधून विचार येत होते, ‘माझ्या लहानपणापासून श्री सरस्वतीदेवी सतत माझ्या समवेतच आहे. माझ्याकडून शाळेत झालेल्या सरस्वतीदेवीच्या पूजेपासून आजमितीपर्यंत माझ्या समवेत हीच देवी आहे. तिने माझ्यावरची कृपा कधीच न्यून केली नाही आणि ती अखंड माझ्या समवेतच राहिली.’ हे मला बुद्धीच्या स्तरावर अनुभवता आले आहे.
३. भक्तीसत्संगात आणि नंतरही भावस्थिती अनुभवणे
भक्तीसत्संगात मला पूर्णवेळ निर्विचार स्थिती अनुभवता आली. मी भक्तीसत्संग ऐकतांना मधून मधून माझ्या डोळ्यांत भावाश्रू यायचे. यानंतर दिवसाच्या उर्वरित कालावधीतही मी याच भावस्थितीत होतो.
मला या अनुभूती दिल्याबद्दल मी परात्पर गुरुदेवांप्रती (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती) कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. अरुण डोंगरे (वय ६९ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.१०.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |