परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात सौ. वृंदा मराठे यांना आलेल्या अनुभूती
साधकांना अनुभूतीच्या माध्यमातून आनंद देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात आलेल्या अनुभूती
१ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांवर सूक्ष्मातून ‘स्वस्तिक’ आणि ‘ॐ’ अशी शुभचिन्हे दिसणे : ‘एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात आम्ही (मी आणि यजमान श्री. वीरेंद्र) उपस्थित होतो. मी शरणागत राहून परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांकडे पहात होते. तेव्हा मला सूक्ष्मातून ‘त्यांच्या चरणांवर सुदर्शनचक्र गोल फिरत आहे’, असे दिसले. मी त्याकडे एकाग्रतेने पहाण्याचा प्रयत्न केल्यावर मला त्याच ठिकाणी त्रिशूळ दिसू लागले. मी प्रार्थना करत परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांकडे पहात होते. तेव्हा मला त्यांच्या चरणांवर ‘स्वस्तिक’ आणि ‘ॐ’ दिसले. मला अशा प्रकारे चरणांवर भराभर सगळी शस्त्रे आणि दैवी चिन्हे दिसू लागली. ती दृश्ये सतत दिसून अदृश्य होत होती. मला तलवार किंवा त्रिशूळ दिसायचे, तेव्हा त्याचे वरचे टोक बाहेरच्या दिशेला असायचे. कोणत्याही शस्त्राचे टोक वरच्या दिशेने, म्हणजे परात्पर गुरु डॉक्टरांच्या दिशेने नव्हते.
१ आ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या दोन्ही चरणांच्या अंगठ्यांतून आमच्याकडे शक्ती प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवत होते.
२. सत्संग झाल्यावर पुढचे ४ दिवस सत्संगातील चैतन्याचा परिणाम जाणवणे
सत्संग झाल्यावर पुढचे ४ दिवस ‘मला आध्यात्मिक स्तरावर लाभ होत आहेत’, असे मला जाणवले. या ४ दिवसांत अकस्मात् अंगदुखी होत होती. संगणकावर सेवा करतांना मला ‘दीर्घ जांभया येणे, प्रचंड प्रमाणात ग्लानी येणे’, असे होत होते.’ (‘सत्संगातील चैतन्यामुळे साधिकेला आध्यात्मिक स्तरावर लाभ होऊन तिच्यातील त्रासदायक शक्ती जांभयांच्या माध्यमातून बाहेर पडत होती.’ – संकलक)
– सौ. वृंदा मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
|