धर्मांधांचे कुटील कारस्थान ओळखून हिंदूंनी एकत्र यावे ! – सतीश कोचरेकर, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
भिवंडी येथे कार्यक्रम
ठाणे, ५ ऑक्टोबर (वार्ता.) – आज हिंदूंवर विविध माध्यमांतून आक्रमणे होत आहेत. धर्मांधांचे हे कुटील कारस्थान ओळखून हिंदूंनी एकत्र यायला हवे. केवळ भावनिक स्तरावर कार्य न करता आध्यात्मिक स्तरावर कार्य होणे आवश्यक आहे. हिंदूंनी मंदिरांमध्ये धर्मशिक्षणवर्गाच्या माध्यमातून एकत्र येणे आवश्यक आहे. हिंदू जागृत झाल्यास हिंदु धर्मियांवरील ही आक्रमणे रोखणे शक्य होईल, असे वक्तव्य हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी भिवंडी येथे केले. येथील वेहेळे गाव भागातील लोढा धाम येथे हिंदु आगरी-कोळी संघटनेच्या वतीने धर्म जागरण शिबिर आणि सामाजिक उपक्रम यांचे आयोजन करण्यात आले होते. संघटनेचे अध्यक्ष महेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या अधिवेशनाला आगरी-कोळी भूमीपुत्र महासंघाचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता भारद्वाज चौधरी हे मुख्य अतिथी म्हणून लाभले होते.
हिंदुतेजसूर्य श्री. धनंजय देसाई यांनी उपस्थितांशी ‘व्हिडिओ कॉल’द्वारे संवाद साधून संघटनेला धर्मकार्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रत्येक परिस्थितीत पाठीशी खंबीरपणे उभे रहाणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. अंजुर गाव येथील महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. वंदना चव्हाण यांनी संस्कार, धार्मिक आणि सांस्कृतिक या विषयांवर, तसेच ‘महिलांचे सक्षमीकरण’ याविषयी मार्गदर्शन केले. यानंतर आपल्या दैनंदिन जीवनातून हलाल प्रमाणित उत्पादनांचा वापर हद्दपार करून स्थानिक भूमीपुत्रांचा रोजगार आणि व्यवसाय यांना अधिक पाठबळ देण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले.