कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणार्या ४ बनावट पोलीस अधिकार्यांना अटक !
मुंबई – कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणार्या ४ बनावट पोलीस अधिकार्यांना गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. यातील काही जण सीबीआयचे अधिकारी असल्याची बतावणी करत होते. जिवा अहिरे, गिरीश वालेचा, मंगल पटेल, किशोर चौबल अशी या आरोपींची नावे आहेत.
उन्नतनगर येथील ‘आस्तिक ट्रेडिंग’ आस्थापनात ४ जण घुसले असून ते सीबीआय (केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग) आणि पोलीस यांचे ओळखपत्र दाखवून ५ लाख रुपयांची मागणी करत आहेत, अशी तक्रार गोरेगाव पोलिसांना ३० सप्टेंबर या दिवशी प्राप्त झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोचून चौघांना अटक केली. आरोपींकडे सीबीआय आणि पोलीस यांची बनावट ओळखपत्रे सापडली. व्यवसायासाठी कर्ज घेणार्यांना ही टोळी फसवत होती.