सूरत (गुजरात) येथे गरबा कार्यक्रमात तैनात मुसलमान सुरक्षारक्षकांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चोपले !
सूरत (गुजरात) – येथील एका गरबा मंडपात मुसलमान सुरक्षारक्षक ठेवण्यात आल्याने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तेथे प्रवेश करून या सुरक्षारक्षकांना दांडक्यांद्वारे चोपले. यात २ जण घायाळ झाले असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. ही घटना ३ ऑक्टोबरच्या रात्री व्हीआयपी रोडवरील ठाकोरजी वाडीत घडली. काही सुरक्षारक्षक घटनास्थळावरून पळ काढल्यामुळे बचावले. या प्रकरणी पोलिसांत कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही. आता गरबा कार्यक्रमासाठी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त पाठवला आहे.
१. सुरक्षारक्षकांपैकी अहमद खान याने सांगितले की, कार्यक्रमात १००हून अधिक सुरक्षारक्षक होते. बजरंग दलाचे सदस्य चारही बाजूंनी असलेले पडदे फाडून आत शिरले. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी लाकडी दांडके आणले होते. पहिल्यांदा त्यांनी एका सुरक्षारक्षकाला नाव विचारले. तो मुसलमान असल्याचे समजल्यानंतर त्यांनी त्याला बाहेर नेऊन मारहाण केली. या वेळी एकूण ५ मुसलमान सुरक्षारक्षकांना मारहाण करण्यात आली. त्यापैकी ३ जण घटनास्थळावरून पळून गेले.
२. दक्षिण गुजरात बजरंग दलाचे अध्यक्ष देवप्रसाद दुबे म्हणाले की, आम्ही याआधीच कार्यक्रम आयोजकांना मुसलमान तरुणांना सुरक्षारक्षक न ठेवण्याची ताकीद दिली होती; मात्र तरी देखील ठाकोरजी वाडी येथे गरबा कार्यक्रमाच्या आयोजकांनी मुसलमान सुरक्षारक्षकांची नेमणूक केली होती.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमाच्या ठिकाणी मुसलमान सुरक्षारक्षक कशाला ? हिंदूच असलेल्या आयोजकांना हे कळत कसे नाही ? |