हिंदूंच्या शस्त्रास्त्रांची दैवी आणि आध्यात्मिक परंपरा !
१. तलवार : ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि तलवार’ असे म्हटले, तरी आपल्या डोळ्यांसमोर भवानी तलवार घेतलेल्या शिवरायांचे रूप येऊन अंगावर रोमांच येतात. श्री भवानीमातेने दिलेली भवानी तलवार घेऊन मोठमोठ्या शत्रूंना नमवून मर्द मावळ्यांच्या साहाय्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना करणार्या छत्रपती शिवाजी महाराजांसमोर आपण नतमस्तक होऊया !
२. धनुष्यबाण : धनुष्यबाणामुळे प्रभु श्रीरामाची आठवण येते. श्रीराम कोदंडधारी (धनुर्धारी) आहेत. सीतेच्या स्वयंवराच्या वेळी अनेक राजांनाही जमले नाही, असे शिवधनुष्य केवळ श्रीरामानेच उचलून दाखवले. अशा या सामर्थ्यवान असणार्या धनुर्धारी श्रीरामाचे विजयादशमीनिमित्त स्मरण करूया !
३. गदा : गदा हे श्रीरामभक्त हनुमानाचे प्रमुख आयुध ! छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याच्या संरक्षणासाठी बांधलेल्या गडदुर्गांच्या महाद्वारापाशी महाबली मारुति हातात गदा घेऊन उभा असलेला दिसतो. संत तुकाराम महाराजांनी त्याला ‘चांगला योद्धा’ असे संबोधले आहे. बजरंगासारखा बलशाली आणि महापराक्रमी असणार्या हनुमानाकडे दसर्यानिमित्त हिंदूंच्या विजयोत्सवासाठी बळ मागूया !
– सौ. रूपाली वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१.१०.२०२२)