राजांच्या काळात साजरा होणारा विजयोत्सव !
राजांच्या काळात दसर्याच्या दिवशी हत्ती, घोडे यांना स्नान घालून त्यांच्यावर भरजरी वस्त्रे आणि अलंकार चढवून त्यांना राजवाड्यासमोर आणले जायचे. सिंहासन पूजनानंतर राजे सीमोल्लंघनाला निघायचे. स्वस्तीवाचन व्हायचे. मिरवणुकीसमवेत रणवाद्येही असायची. शस्त्रसज्ज राजा हत्तीवर अंबारीत वा घोड्यावर बसायचा. मार्गावरील देवदेवतांची पूजा व्हायची. शमी वृक्षाची, अपराजितेची पूजा व्हायची. ‘अपराजिता’ देवीला आणि शमीची प्रार्थना करून राजा खड्ग घेऊन पूर्वेकडून अष्टदिशांना काही पावले चालायचा. इंद्रादी देवांना नमस्कार करून चतुरंग सेनेचे संचलन व्हायचे. मिरवणूक राजवाड्याच्या महाद्वारात आल्यावर सुवासिनी ओवाळायच्या. राजा राजवाड्यात प्रवेश करतांना मंत्रोच्चार, आशीर्वचने व्हायची.
(संदर्भ : संकेतस्थळ)