‘रामलीला’ आणि ‘रावणदहन’ या कार्यक्रमांचे आयोजन करणार्यांनो, समाजातील बोकाळलेली रावणवृत्ती नष्ट होण्यासाठीही प्रयत्न करा !
विजयादशमीला सर्वत्र ‘रामलीला’ आणि ‘रावणदहन’ यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. हे कार्यक्रम फटाके वाजून उत्साहात साजरे केले जातात. या कार्यक्रमांचे फलित काय आहे ? ‘रामलीला’ आणि ‘रावणदहन’ हे कार्यक्रम व्हायला तर हवेतच; पण ते साजरे करण्यामागील उद्देश लक्षात कोण घेतो ? रामाची लीला काय होती आणि रावणदहन का केले ? याचा अर्थही अनेकांना ठाऊक नसेल. हे कार्यक्रम साजरे करणार्यांनी समाजातील दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांकडून केला जाणारा हिंदूंचा पराभव आणि महिलांचे अपहरण यांविरोधात आवाज उठवला आहे का ? सर्वत्र वाढणारी माजलेली रावणवृत्ती (दुष्ट वृत्ती) नष्ट होण्यासाठी प्रयत्न कधी करणार ? दुष्टांचा पराभव केल्यासच विजय होईल, हे लक्षात घेऊन कृतीशील व्हा ! यासाठी आता हिंदूंनी पहिले पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे. तसे करणे हेच काळानुसार अपेक्षित असलेले सीमोल्लंघन ठरेल !
– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.