९ महिलांचे लैंगिक शोषण करणारा चित्रपट निर्माता साजिद खान ‘बिग बॉस’च्या व्यासपिठावर !
सामाजिक माध्यमांतून विरोध !
मुंबई – ‘रिऍलिटी शो ‘बिग बॉस १६’मध्ये असलेल्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये चित्रपट निर्माता साजिद खान याचाही समावेश करण्यात आला आहे. खान याच्यावर ९ महिलांनी लैंगिक शोषण करण्याचे आरोप केले होते. त्यामुळे गेली ४ वर्षे त्याला कुणीच काम दिले नाही. त्याचे चित्रपटही चालले नाहीत, असे अभिनेते सलमान खान यांच्यासमोर तो रडगाणे गात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. साजिद खान याला बिग बॉसच्या कार्यक्रमात स्थान मिळाल्याने त्याला सामाजिक माध्यमांतून विरोध केला जात आहे.
१. गायिका सोना महापात्रा यांनी साजिद खानला ‘बिग बॉस १६’मध्ये स्थान मिळाल्याला विरोध दर्शवला आहे. महापात्रा म्हणाल्या की, अशांना बोलावण्यातून भारतीय वाहिन्यांची अनैतिकता स्पष्ट होते. हे निंदनीय आहे.
२. चित्रपट अभिनेत्री शहनाज गिल आणि कश्मिरा शाह यांनी साजिद खान याला समर्थन दिल्याने त्या दोघींनाही ‘ट्रोल’ (विरोध) केले जात आहे.
३. एका व्यक्तीने लिहिले की, ‘बिग बॉस १६’ प्रदर्शित करणार्या ‘कलर्स’ वाहिनीवर विश्वास ठेवता येणार नाही. साजिद खानसारख्या व्यक्तीला व्यासपीठ देऊन एक प्रकारे त्याच्या कृत्यांना पाठीशी घातले जात आहे. त्याच्यावर आरोप आहेत. तो खरेच एक लैंगिक गुन्हेगार आहे.
संपादकीय भूमिका
|