हिंदु युवकाची मालमत्ता हडपण्यासाठी विवाहित मुसलमान महिलेने स्वीकारला हिंदु धर्म !
देहराडून (उत्तराखंड) – येथे सुकान्त नावाच्या एका हिंदु युवकाची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता हडपण्यासाठी शोरेन नावाच्या विवाहित मुसलमान महिलेने त्याच्याशी मैत्री केली. शोरेनने ती अविवाहित असल्याचे सांगून ‘हॉटेल मॅनेजमेंट’मध्ये शिक्षण घेतल्याचेही त्याला खोटे सांगितले. तिने धर्मांतर करून हिंदु धर्म स्वीकारला आणि सप्टेंबर २०१९ मध्ये सुकान्तशी विवाहही केला. पुढे तिचा खोटेपणा समोर आल्यावर तिने सुकान्तला, ‘तुझी मालमत्ता विकून मला ४ कोटी रुपये दे, अन्यथा तुला खोट्या प्रकरणात गोवण्यात येईल’, असे सांगितले.
सुकान्तने दिलेल्या माहितीनुसार विवाहानंतरही शोरेन एका पुरुषाच्या संपर्कात होती आणि त्याला भेटायची. कालांतराने सुकान्तला पुणे येथे एका हॉटेलमध्ये नोकरी मिळाली. तिथे त्याने शोरेनलाही नेले. तिलाही पुण्यातील अन्य एका हॉटेलमध्ये नोकरी देण्यासाठी तो प्रयत्न करू लागला. तेव्हा तिचे दहावीचे शिक्षणही झाले नसल्याचे समोर आले. तिचा खोटेपणा उघड झाल्याने सुकान्तला देहराडून येथील त्याची संपत्ती विकून त्याचे पैसे तिला देण्यासाठी तिने दबाव बनवला. या षड्यंत्रामध्ये शोरेनचे आई-वडीलही सहभागी आहेत. पोलीस प्रकरणाचे पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिका
|