उत्तरकाशीमधील शिखरावर झालेल्या हिमस्खलनामुळे १० जणांचा मृत्यू, तर १८ जण बेपत्ता
उत्तरकाशी (उत्तराखंड) – येथील ‘द्रौपदी का डांडा-२’ या शिखराजवळ झालेल्या हिमस्खलनामुळे १० जणांचा मृत्यू झाला आहे, तर १८ जण बेपत्ता झाले आहेत. येथे जिल्हा प्रशासन, एन्.डी.आर्.एफ्., एस्.डी.आर्.एफ्, भारतीय सैन्य आणि आय.टी.बी.पी. यांच्याकडून साहाय्यता कार्य चालू आहे. मृत आणि बेपत्ता असणारे सर्व जण उत्तरकाशीच्या नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनिअरिंगच्या ट्रेकिंग ग्रूपचा भाग होते. यामध्ये ३३ प्रशिक्षणार्थी आणि ७ प्रशिक्षक यांचा समावेश होता.