सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा विजयादशमीनिमित्त संदेश !
🍃 हिंदूंनो, ‘शत्रू आक्रमण करण्याचे साहस करणार नाही’, असे सीमोल्लंघन करा ! 🍀
‘विजयादशमी’ हा हिंदूंच्या देवता आणि महापुरुष यांच्या विजयाचा दिवस आहे. ‘आसुरी शक्तींचा पराभव आणि आणि दैवी शक्तींचा विजय’, हा या दिवसाचा इतिहास आहे. यासाठीच या दिवशी अपराजितापूजन आणि सीमोल्लंघन करण्याची सनातन परंपरा आहे. आज शत्रू काश्मीरची सीमा नव्हे, तर देहलीपासून गल्लीपर्यंत सीमोल्लंघन करून हिंदूंना लक्ष्य करत असतांना आम्ही घराघरांत बसून कर्मकांड म्हणून अपराजितेचे पूजन करणे, तसेच सीमोल्लंघन म्हणून अपरान्हकाळी गावाच्या वेशीवरील मंदिरात दर्शन घेणे, ही औपचारिकता पूर्ण करत आहोत. हिंदूंनो, ही विजयादशमी नव्हे ! हिंदु समाज अजिंक्य रहावा, यासाठी निष्ठेने आणि भक्तीने अपराजितादेवीचे पूजन करा, तर ती निश्चित तुमच्यावर विजयाची कृपा करील. त्याचप्रमाणे ‘शत्रू आक्रमण करण्याचे साहसच करणार नाही’, असे सीमोल्लंघन करा. त्यातूनच विजयादशमीचा सण साजरा करण्याचा खरा आनंद मिळेल !’
✍🏻 – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, संस्थापक संपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिके.