आजपासून दुबईतील पहिल्या हिंदु मंदिरात भाविकांना मिळणार प्रवेश !
दुबई (संयुक्त अरब अमिरात) – उद्या दसर्याच्या मुहूर्तावर येथील पहिल्या हिंदु मंदिरात हिंदूंना प्रवेश दिला जाणार आहे. या मंदिराचे उद्घाटन ४ ऑक्टोबर या दिवशी करण्यात आले आहे. येथील जेबेल अली भागात हे मंदिर बांधण्यात आले आहे.
दुबई में आज खुलेगा मंदिर, एक साथ हजारों लोग कर सकेंगे दर्शन दुबई में आज खुला हिंदू मंदिर, एक साथ हजारों लोग कर सकेंगे दर्शन https://t.co/nTYbL842wJ
— tezz khabren (@tezzkhabren) October 4, 2022
दर्शनासाठी ‘क्यूआर् कोड’द्वारे आरक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे मंदिराची सुरक्षा आणि तेथील गर्दी टाळली जाणार आहे. हे मंदिर सकाळी साडेसहा आणि रात्री ८ पर्यंत उघडे रहाणार आहे. येथे प्रतिदिन १ सहस्र ते १ सहस्र २०० भाविक दर्शन घेऊ शकणार आहेत. या मंदिरात १६ देवतांच्या मूर्ती असणार आहेत. तसेच शिखाचा पवित्र धर्मग्रंथ ‘गुरुग्रंथ साहिब’ ठेवण्यात येणार आहे.