मदरशातील आचार्याने दलित विद्यार्थिनींसमोर विवस्त्र होऊन बलात्कार करण्याची दिली धमकी !
जयपूर (राजस्थान) – राज्यातील भिवाडी जिल्ह्यात असलेल्या खिदरपूर गावातील नूरदीन नावाचा मदरशातील एक आचारी काही दलित विद्यार्थिनींसमोर विवस्त्र झाला. विद्यार्थिनींशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तो त्यांच्यावर दबाव बनवू लागला.
राजस्थान के भिवाड़ी में मदरसे में खाना बनाने वाले नूरदीन पर स्कूल जाती दलित छात्राओं के आगे कपड़े उतार कर रेप की धमकी देने का आरोप लगा है।https://t.co/Fp6QxZRj2W
— ऑपइंडिया (@OpIndia_in) October 3, 2022
जेव्हा विद्यार्थिनींनी त्यास विरोध केला, तेव्हा त्याने धमकावत म्हटले की, ‘‘तुमचे स्थान माझ्या अंथरुणात आहे. या आणि माझ्या मुलांना जन्म द्या !’’ तसेच त्यांच्यावर बलात्कार करून हत्या करण्याचीही धमकी दिली. घाबरलेल्या विद्यार्थिनींनी त्यांच्या कुटुंबियांना याविषयी माहिती दिल्यावर त्यांनी पोलिसात तक्रार प्रविष्ट केली. पोलीस घटनेचे अन्वेषण करत आहेत. नूरदीनला अजून अटक करता आलेली नाही.
संपादकीय भूमिका
|