गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील मंदिरात हिंदु नाव धारण करून प्रवेश करणार्या मुसलमानाकडे सापडली प्राणघातक शस्त्रे !
मंदिराचे महामंडलेश्वर गिरि यांच्या हत्येचा प्रयत्न असल्याचा दावा
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील मसुरी भागातील इकला मंदिरामध्ये आस महंमद नावाचा मुसलमान पिस्तूल, चाकू आणि अन्य धारदार शस्त्रासह घुसल्याची घटना समोर आली आहे. येथील महामंडलेश्वर स्वामी प्रबुद्ध आनंद गिरि यांची हत्या करण्याच्या उद्देशाने तो मंदिरात समीर शर्मा नाव सांगून घुसल्याचे चौकशीत उघड झाले आहे. पोलीस त्याची अधिक चौकशी करत आहेत. महंमद जेव्हा मंदिरात घुसला होता, तेव्हा महामंडलेश्वर आनंद गिरि मंदिरातच होते. या घटनेनंतर पोलिसांनी मंदिरात येणार्या प्रत्येकाची चौकशी करण्यास चालू केले आहे.
सौजन्य: News Nation
महामंडलेश्वर आनंद गिरि यांनी सांगितले की, महंमद जेव्हा मंदिरात आला होता, तेव्हा त्याने स्वतःचे नाव समीर शर्मा म्हणून सांगितले. मंदिराच्या सेवेकर्यांनी जेव्हा त्याच्या सामानाची पडताळणी केली, तेव्हा त्याच्याकडे पिस्तूल, चाकू आणि ब्लेड कटर सापडले. ‘तो माझ्या हत्येसाठीच आला होता. यासाठी त्याला १ लाख रुपयांची सुपारी मिळाली होती’, असा दावा महामंडलेश्वरांनी केला. ‘यापूर्वीही माझ्या हत्येचा कट रचण्यात आला होता. जर सेवेकर्यांनी त्याला पकडले नसते, तर त्याने मला ठार मारले असते. पोलिसांनी आता याविषयी सखोल चौकशी केली पाहिजे’, असेही ते म्हणाले.
संपादकीय भूमिकाआता पोलीस यालाही ‘मनोरुग्ण’ म्हणून सोडून देणार का ? |