जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस महासंचालक (कारागृह) यांची मुसलमान नोकराकडून गळा चिरून हत्या
|
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरच्या कारागृह विभागाचे पोलीस महासंचालक हेमंत लोहिया यांची ३ ऑक्टोबरच्या रात्री उशिरा त्यांच्याच घरात हत्या त्याच्या यासीर नावाच्या नोकराने हत्या केली. हत्येनंतर मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या घटनेनंतर यासीर पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याच्या सापडलेल्या दैनंदिनीमधील लिखाणावरून त्याला मानसिक आजार असल्याचे मत पोलिसांनी व्यक्त केले आहे. तसेच या मागे आतंकवादी आक्रमण नाही, असेही पोलिसांनी सांगितले आहे. दुसरीकडे हत्येच्या सुमारे १० घंट्यांनंतर म्हणजे ४ ऑक्टोबरला सकाळी ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या आतंकवादी संघटनेने लोहिया यांच्या हत्येचे दायित्व स्वीकारले आहे. या संघटनेने सामाजिक माध्यमांतून हे सांगितले आहे. ही संघटना लष्कर-ए-तोयबा या आतंकवादी संघटनेशी संलग्न संघटना आहे. संघटनेने म्हटले ‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना ही आमची छोटीशी भेट आहे. आम्ही कधीही, कुठेही, कोणालाही मारू शकतो.’ अमित शहा सध्या काश्मीरच्या दौर्यावर आहेत.
जम्मू कश्मीर के DG जेल हेमंत के लोहिया की उनके घर पर हत्या कर दी गई… #Jammukhasmir #DGHKLohiaMurderCase | @sunilJbhat
— AajTak (@aajtak) October 4, 2022
जम्मू क्षेत्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंह यांनी सांगितले की, लोहिया यांचा गळा चिरण्यात आला होता. त्याच्या अंगावर भाजलेल्या खुणाही आढळून आल्या आहेत. घटनेपूर्वी लोहिया यांनी पायाला तेल लावल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यांच्या पायाला सूज आली होती. मारेकर्याने काचेच्या बाटलीने त्यांचा गळा चिरून हत्या केल्यानंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. आरडाओरडा ऐकून कुटुंबीय धावले. आधी त्यांना उशीने दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुरक्षा दलांना प्रथम खोलीत आग लागल्याचे दिसले. दरवाजा आतून बंद होता. त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला.
बँकेच्या व्यवस्थापकावर गोळीबार
या घटनेपूर्वी ३ ऑक्टोरलाच दुपारी बारामुलामध्ये काही आतंकवाद्यांनी एका बँक व्यवस्थापकावर गोळीबार केला; मात्र यात ते बचावले.
संपादकीय भूमिकापोलीस महासंचालकांची अशा प्रकारे हत्या होणे, पोलिसांना लज्जास्पद ! |