७ वर्षे कुठेही बाहेर जाऊ शकत नसल्यामुळे प.पू. डॉक्टरांना झालेले लाभ !
‘पूर्वी मला वाटायचे, ‘झाडे, डोंगर इत्यादी एकाच जागी उभे असतात. त्यांना त्याचा कंटाळा येत नसेल का ?’ याचे उत्तर माझ्या आजारपणाने मला दिले. गेली ७ वर्षे मी कुठेही बाहेर जाऊ शकत नाही, तरी केवळ खिडकीतून दिसणार्या दृश्याला पाहून मी आनंदी आहे. असेही म्हणता येईल की, ‘परिस्थितीबद्दल तक्रार न करता आहे ती स्थिती स्वीकारून आनंदी कसे रहायचे’, हे मी या काळात शिकलो. बाहेर जाता न येण्याचा मला आणखीन एक लाभ झाला आणि तो म्हणजे इकडे-तिकडे जाण्यात वेळ फुकट न गेल्याने मी ग्रंथलिखाणावर लक्ष केंद्रित करू शकतो.’
– डॉ. आठवले (२.१०.२०१४)