दिनजपूरच्या खंसमा उपजिल्ह्यात श्री दुर्गापूजा मंडपाच्या बाहेर निदर्शने
बांगलादेशमध्ये हिंदु महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचे प्रकरण !
ढाका – बांगलादेशमध्ये श्री दुर्गादेवीच्या मंदिरात शनिवार १ ऑक्टोबरपासून श्री दुर्गापूजेचा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात चालू झाला आहे; परंतु दिनजपूरच्या खंसमा उपजिल्ह्यात हिंदूंनी श्री दुर्गापूजेचा उत्सव साजरा न करता, तेथील हिंदु महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करणार्या आरोपीला अटक करण्यासाठी मागणी करत श्री दुर्गापूजा मंडपाच्या बाहेर निदर्शने केली. या प्रकरणी तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे; परंतु अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही, असे खंसमा उपजिल्हा श्री दुर्गापूजा उत्सव समितीचे अध्यक्ष धीमन दास यांनी सांगितले. ‘बांगलादेशच्या पोलीस अन्वेषण आयोगाकडून या प्रकरणाचे अन्वेषण करण्यात येत आहे’, असे ते पुढे म्हणाले.
‘जोपर्यंत हिंदु महिलेच्या हत्येला न्याय मिळत नाही, तोपर्यंत कोणताही धार्मिक सण धूमधडाक्यात साजरा केला जाणार नाही’, असे एक हिंदु नेता अनंतकुमार रॉय यांनी सांगितले.
संपादकीय भूमिका
|