ऑक्टोबर मासामध्ये कोणती लागवड करावी ?
सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम
‘या मासामध्ये पावसाचा जोर ओसरल्यानंतर सर्व हिवाळी पिकांची लागवड चालू करता येते. यामध्ये मुख्यत्वे सर्व प्रकारच्या पालेभाज्या; बीट, गाजर, बटाटे यांसारखे कंद; वाटाणे, पावटे यांसारख्या शेंगभाज्या लावता येतात. कांदा-लसूण यांचीही लागवड करता येते. सर्व प्रकारच्या मिरच्या, वांगे, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर या भाज्यांची लहान कागदी कप किंवा लहान कुंड्यांमध्ये अगोदर लहान रोपे सिद्ध करावीत. ती साधारण २५ दिवसांची झाल्यावर त्यांतील सशक्त रोपे निवडून त्यांची वाफे किंवा मोठ्या कुंड्यांमध्ये लागवड करावी.’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (१७.९.२०२२)