भाग्यनगर (तेलंगाणा) येथे ३ आतंकवाद्यांना अटक
दसर्याला भाजप आणि रा.स्व. संघ यांच्या कार्यक्रमांत हातबाँब फेकून करणार होते आक्रमण !
भाग्यनगर (तेलंगाणा) – विशेष कृती दलाने येथून एकूण २० जणांना अटक केली असून त्यात अब्दुल जाहेद उपाख्य मोटू, महंमद समीउद्दीन आणि माझ हसन फारूख हे तिघे आतंकवादी आहेत. या तिघांनी घातपाताची एक योजना सिद्ध केली होती. या योजनेनुसार ते ५ ऑक्टोबर २०२२ या दिवशी दसर्यानिमित्त होणार असलेल्या भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून चेंगराचेंगरी घडवून आणणार होते. यासाठी आतंकवाद्यांनी आवश्यक ती सिद्धता केली होती. ते पाकिस्तानमधील त्यांच्या प्रमुखाच्या संपर्कात होते. आतंकवाद्यांनी घातपाताची योजना यशस्वी करण्यासाठी आणखी काही जणांना हाताशी धरले होते. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी करून धरपकड चालू केली आहे. अटक केलेल्यांकडून ४ लाख रुपयांची रोकड आणि ४ हँडग्रेनेड (हातबॉम्ब) जप्त केले. काही चिथावणी देणार्या माहितीची कागदपत्रे, तसेच घातपाताच्या योजनेशी संबंधित निवडक महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली.
Hyderabad: Police foil ISI terror attack plan, 3 including Abdul Zahed arrested with grenades, Zahed was earlier released for lack of evidencehttps://t.co/jVkEjjuA6y
— OpIndia.com (@OpIndia_com) October 3, 2022
१. अटक केलेल्या या आतंकवाद्यांच्या संपर्कात असलेले आदिल अफरोज, अब्दुल हादी, सोहेल कुरेशी आणि अब्दुल कलीम उपाख्य हादी या चौघांचा शोध चालू आहे. हे चौघे पसार आहेत. अब्दुल जाहेद उपाख्य मोटू आणि त्याचे सहकारी पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.चे अधिकारी आणि लष्कर-ए-तोयबा या आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्यांच्या संपर्कात होते. घौरी, हंजाला आणि माजीद अशी त्यांची नावे आहेत.
२. मोटू याच्यावर वर्ष २००५ मधील भाग्यनगरच्या बाँबस्फोटात हात असल्याचाही आरोप आहे.
३. भाजप आणि संघ यांच्या सभा चालू असतांना चेंगराचेंगरी व्हावी आणि मोठ्या संख्येने जीवितहानी व्हावी, यासाठी आतंकवादी सभास्थळी हँडग्रेनेड (हातबॉम्ब) फेकण्याची सिद्धता करत होते.