आगरा (उत्तरप्रदेश) येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांकडून लाल किल्ल्यापर्यंत दुर्गामाता दौड

दुर्गामाता दौडमध्ये सहभागी झालेले श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी
आगर्‍यामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी

आगरा (उत्तरप्रदेश) – हिंदूंमध्ये विशेषतः युवकांमध्ये शौर्य अन् भक्तीचे जागरण व्हावे; म्हणून ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षी नवरात्रीमध्ये ९ दिवस ‘दुर्गामाता दौडी’चे आयोजन केले जाते. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यापासून गावस्तरापर्यंत पोचलेली ही दौड आता उत्तरप्रदेशमध्येही चालू झाली आहे. छत्रपती शिवरायांच्या शौर्यशाली इतिहासात आगरा आणि तेथील लाल किल्ल्याचे विशेष महत्त्व आहे. अशा लाल किल्ल्यावर या वर्षी आगर्‍यातील काही धारकर्‍यांनी दुर्गामाता दौड चालू केली आहे. स्थानिक हिंदुत्वनिष्ठांच्या दृष्टीने हा अत्यंत अनोखा आणि विशेष उपक्रम सर्वांना नवरात्रीमध्ये प्रतिदिन सकाळी पहायला मिळत आहे. मराठा समाजाचे प्रमुख श्री. विनोद पोळ आणि अन्य धारकरी प्रतिदिन या दौडीमध्ये उत्साहाने सहभागी होत आहेत.