मुंबई विमानतळावरील विमान बाँबद्वारे उडवण्याची धमकी !
असुरक्षित मुंबई !
मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मुंबई येथून कर्णावती (अहमदाबाद) येथे जाणारे ‘इंडिगो’ आस्थापनाचे विमान बाँबने उडवण्याच्या धमकीचा ई-मेल आला आहे. १ ऑक्टोबरच्या रात्री हा मेल आला. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी विमानाची संपूर्ण पडताळणी केली असता विमानामध्ये कोणतीही आक्षेपार्ह वस्तू नसल्याची निश्चिती केल्यानंतर विमान सोडण्यात आले.
सोमालिया देशातून हा संदेश पाठवण्यात आला होता. धमकीच्या ईमेलनंतर स्थानिक पोलिसांसह आतंकवादविरोधी पथक, बाँबशोधक आणि नाशक पथक यांनी विमानाची पडताळणी केली. रात्री ९.३० वाजता हे विमान कर्णावतीला निघणार होते; मात्र विमानाची पडताळणी करण्यात आल्यानंतर रात्री १० वाजून ५८ मिनिटांनी हे विमान कर्णावतीला रवाना झाले.