‘टीईटी’ संदर्भातील कार्यवाहीस विलंब झाल्यास अधिकार्यांवरच कारवाई !
प्राथमिक शिक्षण संचालकांची उपसंचालकांना चेतावणी
पुणे – राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) अपप्रकार केलेल्या उमेदवारांची सुनावणी घेऊन वैयक्तिक मान्यता आणि मान्यता शालार्थ ‘आयडी’ रहित करण्याची प्रक्रिया ८ दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते; मात्र उपसंचालकांनी त्या विषयीचा अहवाल अद्यापही सादर केलेला नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या संदर्भातील कार्यवाहीस विलंब झाल्यास आता संबंधित अधिकार्यांवरच कारवाई करण्याची चेतावणी देण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी या संदर्भातील पत्र विभागीय उपसंचालकांना दिले आहे.