शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गुप्ता यांना हटवले !
नागपूर, २ ऑक्टोबर (वार्ता.) – व्हेंटिलेटरअभावी एका मुलीचा मृत्यू आणि अन्य प्रकरणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांना तात्काळ हटवून डॉ. राज गजभिये यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. सुधीर गुप्ता यांच्या समवेत प्रा. डॉ. हरीश सपकाळ आणि अन्य संबंधित यांची महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) तरतुदींचा भंग केल्याप्रकरणी विभागीय चौकशी करण्यात आली.