सचिन वाझे प्रतीमास मातोश्रीवर १०० कोटी रुपये पाठवत होते ! – खासदार प्रताप जाधव यांची टीका
बुलढाणा – सचिन वाझे हे प्रतीमास ‘मातोश्री’वर १०० कोटी रुपये पाठवत होते, अशी टीका शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केली आहे. बुलढाण्यात ‘हिंदू गर्व गर्जना’ कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करत होते. त्यानंतर त्यांनी वरील विधानाविषयी सारवासारव केली आहे.
ॲन्टिलिया प्रकरणात सध्या कारागृहात असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते होते, हे कागदोपत्री स्पष्ट झाले आहे. सचिन वाझे यांना पुन्हा पोलीसदलात घेण्यात आले, त्या वेळी कुणी दबाव टाकला होता ? कुणी विशेष प्रयत्न केले होते ? हेही न्यायालयात नोंद आहे, असे प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना भाजप नेते आशिष शेलार म्हणाले.