लातूर येथे हिंदुत्वनिष्ठांनी घेतली श्री अंबामातेच्या मंदिरामध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा !
लातूर, २ ऑक्टोबर (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु राष्ट्र संकल्प अभियानांतर्गत २७ सप्टेंबर या दिवशी येथील गंजगोलाईमधील श्री अंबामातेच्या मंदिरामध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेण्यात आली. या वेळी ‘वीर योद्धा संघटने’चे अध्यक्ष श्रीकांत रांजणकर, धर्मप्रेमी श्री. रत्नदीप निगुडगे, श्री. विजयकुमार वाघमारे, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री देशमुख, श्री. विपुल भोपळे यांच्यासह मोठ्या संख्येने धर्मप्रेमी उपस्थित होते.