(म्हणे) ‘नागपूरची ‘हाफ चड्डी’ घातल्यावर स्पर्धा परीक्षा द्यावी लागत नाही, माणूस थेट ‘जॉईंट सेक्रेटरी’ होतो ! – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
बुलढाणा – प्रशासकीय व्यवस्थेमध्ये जिल्हाधिकारी व्हायचे असेल, पोलीस अधीक्षक व्हायचे असेल, डी.एफ्.ओ. व्हायचे असेल, ‘फॉरेन सर्व्हिस’मध्ये जायचे असेल, तर तुम्हाला ‘यू.पी.एस्.सी.’च्या परीक्षा आधी उत्तीर्ण कराव्या लागतात. आता त्या ‘यू.पी.एस्.सी.’च्या परीक्षा नाहीत, तर आता नागपूरची चड्डी ज्यांनी घातली तो डायरेक्ट जॉईंट सेक्रेटरी होतो. अशा प्रकारचे चित्र पहायला मिळत आहे’, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. येथील मेळाव्यात बोलतांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर त्यांनी टीका केली.
संघाच्या शाखेत गेल्यानंतर ‘आपण चुकीच्या वाटेवर होतो’, हे नाना पटोले यांना कळेल ! – राम कदम, आमदार, भाजप
नाना पटोले यांच्या या टीकेला भाजपचे आमदार राम कदम यांनी तात्काळ जोरदार प्रत्युत्तरही दिले. ते म्हणाले, ‘‘हाफ पॅन्ट’चे एवढेच कोडकौतुक असेल, तर नाना पटोले यांनी एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जावे. तेथे गेल्यानंतर नाना पटोले यांना देशप्रेम काय असते ? समर्पितभाव काय आहे ? देशासाठी कसे झिजायचे असते ? हे कळेल. ज्या दिवशी संघाच्या शाखेत जाल त्या दिवशी तुम्हीच सांगाल की, आतापर्यंत मी चुकीच्या वाटेवर होतो.’’
संपादकीय भूमिका
|