रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट देणार्या जिज्ञासूंनी दिलेला अभिप्राय !
१. ‘सनातनच्या रामनाथी आश्रमातील स्वच्छता फार उत्कृष्ट आहे. आश्रमातील चित्रीकरण कक्षाची कल्पना पुष्कळ छान होती. आश्रमाच्या स्वयंपाकघरातील वातावरण आणि सेवा करणार्या साधकांकडे बघून पुष्कळ आनंद झाला.
२. साधना करणार्या साधकांकडे पाहून पुष्कळ चांगले वाटले.
३. सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून : सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन चांगले आहे. ते पाहून ‘दैवी शक्ती कोणती आणि राक्षसी शक्ती कोणती ?’, हे माझ्या लक्षात आले. त्याकडे बघून चांगली प्रेरणा मिळाली.’
– श्री. गौरव मनोहर पाटील, शिंगटेनगर, हिरापूर रोड, चाळीसगाव, जिल्हा जळगाव. (१०.११.२०२१)
१. सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |