‘इतरांना जिंकण्यातील आनंद कसा द्यायचा ?’, हे शिकवणारे प.पू. डॉक्टर !
सर्व साधकांना आनंद मिळवून देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘१७.९.२०१४ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प.पू. डॉक्टरांची ‘साधकांनो, तुम्ही जिंकलात, मी हरलो’, ही कविता वाचल्यावर कु. माधुरी दुसे हिची झालेली विचारपक्रिया !’ हा लेख छापून आला होता. त्या लेखाच्या शेवटी ‘हरण्यातही आनंद असतो, हे शिकण्यासाठी साधकांनी मला सातत्याने, या कवितेतूनही हरवले; म्हणून मीच साधकांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो !’, ही प.पू. डॉक्टरांची टीप वाचून मनात आले, ‘देवाला कुणी हरवू शकत नाही; कारण देवाचे एक एक वाक्य ही दगडावरची रेष आहे. या अज्ञानी जिवाला काही कळत नाही रे देवा ! मला वाटले ‘तुम्ही आता काही लिहिणार नाही’; परंतु तुम्ही जे लिहिले ते वाचून वाटले, ‘आम्ही अजून तुझे भक्त बनण्यास पुष्कळ उणे पडत आहोत.’ तुमच्या त्या वाक्यातूनसुद्धा तुम्ही आम्हाला घडवलेत. ‘इतरांना जिंकण्यातील आनंद कसा द्यायचा ?’, हे शिकवलेत. यासाठी आम्ही आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत’.
– कु. माधुरी दुसे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.९.२०१४)