रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधना करण्यासाठी आल्यावर श्री. अनिकेत जमदाडे यांना आलेल्या अनुभूती आणि स्वतःमध्ये जाणवलेले पालट !
१. रामनाथी आश्रमातील देवतांच्या मूर्तींचे दर्शन घेतांना आलेल्या अनुभूती
अ. ‘एकदा मी रामनाथी आश्रमातील श्री सिद्धीविनायकाच्या मूर्तीचे दर्शन घेत होतो. त्या वेळी माझा आपोआप ‘ॐ गँ गणपतये नमः ।’ असा नामजप चालू झाला.
आ. मी श्री भवानीदेवीचे दर्शन घेतांना ‘देवीला सांगत असलेले देवी ऐकत आहे’, असे मला जाणवले.
२. आश्रमात आल्यावर स्वतःमध्ये जाणवलेले पालट
२ अ. चेहर्यात पालट होणे : माझा चेहरा वेगळा दिसत आहे. ‘तुझ्या चेहर्यात पुष्कळ पालट झाला आहे’, असे अनेक साधकांनी मला सांगितले आणि मलाही तसे जाणवते.
२ आ. माझे मन पुष्कळ सकारात्मक झाले आहे. ‘आता मी आनंदी आहे’, असे मला जाणवते.
२ इ. अनुसंधानात वाढ होणे
२ इ १. ‘सतत नामजप करावा’, असे वाटणे : मला सतत नामजप करण्याची आठवण होते. दिवसभरात माझा नामजप पुष्कळ वेळ होतो, तसेच ‘तो आणखी करावा’, असे मला वाटते.
२ इ २. गुरूंशी अनुसंधान साधणे : ‘सतत गुरुस्मरण करूया. देवाला कसे पाहू ? त्याला आणखी कसे अनुभवू ?’, असे विचार माझ्या मनात असतात. ‘गुरूंशी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी) आणखी अनुसंधान साधले पाहिजे’, असे मला वाटत असते.
३. कधी कधी मला वेगळ्या प्रकारची स्थिरता आणि शांती अनुभवता येते.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच माझ्यामध्ये हे सर्व पालट झाले, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’
– श्री. अनिकेत जमदाडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.६.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार धर्मप्रेमींच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |