उत्तरप्रदेशमधील मदरशांच्या शिक्षणाच्या अवधीत एक घंट्याने वाढ
नमाजाला वेळ ठेवला नसल्याने काही जणांचा विरोध !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील मदरशांतील शिक्षणाचा अवधी एक घंट्यांनी वाढवण्यात आला आहे. आता दिवसभरात ६ घंटे शिकवले जाणार आहे. उत्तरप्रदेश मदरसा बोर्डाने हा आदेश दिला आहे. सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत शिक्षण देण्यात येणार आहे. यात दुपारी साडे बारा वाजता भोजनासाठी अर्धा घंटा सुट्टी असणार आहे. या वेळेत नमाजासाठी कुठेही वेळ नसल्याने त्याला काही जणांकडून विरोध केला जात आहे.
The madrassas, which will operate for six hours from now on, have welcomed the decision but have raised objections over namaz timing#UttarPradesh #Madrasa
(@AbshkMishra) https://t.co/lvRHLtcUAY— IndiaToday (@IndiaToday) September 29, 2022
मौलाना सुफियान निजामी यांचे म्हणणे आहे की, शिक्षणाचा अवधी वाढवल्याने समस्या निर्माण होऊ शकते; कारण येथे शिकणारे आणि शिकवणारे दोघेही नमाजपठण करतात. त्यांच्या नमाजावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मदरसा बोर्डाने यावर पुनर्विचार केला पाहिजे.
संपादकीय भूमिकामुसलमान त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांच्या धार्मिक कृती करण्याचाही विचार करतात, तर हिंदू एरव्हीही धार्मिक कृती करण्याचा विचार करत नाहीत ! |