पुणे येथे भाजयुमोने एम्.आय.टी. महाविद्यालयातील पाकचा ध्वज जाळला !
पी.एफ्.आय.च्या समर्थकांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’ घोषणा दिल्याचे प्रकरण
पुणे – पी.एफ्.आय.चे कार्यकर्ते जर ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देत असतील, तर आपल्याला आपल्या देशातील शिक्षणसंस्थेमध्ये पाकिस्तानचे झेंडे कशाला हवेत ? असा प्रश्न उपस्थित करत भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कोथरूडमधील एम्.आय.टी. शिक्षणसंस्थेमध्ये जाऊन पाकिस्तानचा ध्वज जाळला आहे. पुण्यातील नामवंत ‘एम्.आय.टी. कॉलेज’ हे विश्वविद्यालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी जगभरातील ४८ देशांचे ध्वज लावण्यात आलेले आहेत त्यामध्ये पाकिस्तानचाही ध्वज होता.