मुंबईत १२ आणि १३ नोव्हेंबर या दिवशी होणार ‘हलाल शो इंडिया’ !
‘ब्लॉसम मीडिया’ संस्थेच्या वतीने आयोजन : हलाल उत्पादनांचा करणार प्रचार !
मुंबई – मरिन लाईन येथील इस्लाम जिमखाना येथे १२ आणि १३ नोव्हेंबर या दिवशी ‘हलाल शो इंडिया’ या नावाने हलाल परिषद होणार आहे. हलाल उत्पादनाचा सर्व माध्यमांतून प्रसार करणे, हा या कार्यक्रमामागील उद्देश आहे; जेणेकरून अधिकाअधिक लोक हलाल उत्पादने खरेदी करतील. ‘ब्लॉसम मीडिया’ या संस्थेच्या वतीने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. हलाल उत्पादनांचा सर्व माध्यमांतून प्रसार करण्याची यंत्रणा ही संस्था राबवत आहे.
जागतिक पातळीवर समांतर इस्लामी अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून जगभरातून इतका प्रचंड पैसा गोळा केला जात आहे की, भारताच्या अर्थव्यवस्थेच्या जवळपास ही इस्लामी अर्थव्यवस्था पोचली आहे. भारतासह जगभरात इस्लामी राजवट आण्यासाठी केल्या जाणार्या आतंकवादाच्या कामासाठी, तसेच त्यातील आरोपींचे खटले लढण्यासाठी हा पैसा वापरला जात असल्याचे सिद्ध झाले आहे.
संपादकीय भूमिका
|