हिंदु भगिनींनो, अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी दुर्गास्वरूप व्हा ! – सौ. मंगला दर्वे
चंद्रपूरमध्ये ‘नवरात्रोत्सव’ या विषयावर व्याख्यान !
येरूळ (जिल्हा चंद्रपूर), १ ऑक्टोबर (वार्ता.) – आज कायद्याचा धाक न उरल्याने महिलांची छेड काढणे, विनयभंग, तसेच बलात्कार करणे या घटनांमध्ये पुष्कळ वाढ होत आहे. हिंदु भगिनींनी या विरोधात लढायला सिद्ध करण्यासाठी साक्षात् दुर्गास्वरूप बनले पाहिजे. आपल्या सार्वजनिक उत्सवांमध्ये होणारे अपप्रकार रोखण्यासाठीही आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. मंगला दर्वे यांनी केले. समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त आरंभलेल्या ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियाना’च्या अंतर्गत येरूळ (जिल्हा चंद्रपूर) येथे ‘नवरात्रोत्सव’ या विषयावर नुकतेच व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तेथे त्या बोलत होत्या.
क्षणचित्र – येरूळ येथील हिंदुत्वनिष्ठ महिला सौ. सारिका पारखी यांनी व्याख्यानाचा एकट्याने गावामध्ये प्रसार केला.